esakal | बीडचे भूमिपुत्र विजय राठोड जालन्याचे नवे जिल्हाधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

जालन्याचे जिल्हाधिकारी विजय राठोड

बीडचे भूमिपुत्र विजय राठोड जालन्याचे नवे जिल्हाधिकारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : वर्ष २०१४ च्या भारतीय प्रशासन सेवेच्या तुकडीतील अधिकारी तथा बीड Beed जिल्ह्यातील गेवराईचे भूमिपुत्र असलेल्या डॉ.विजय राठोड IAS Vijay Rathod यांनी बुधवारी (ता.१४) जालन्याच्या Jalna जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. मावळते जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे IAS Ravindra Binwade यांनी डॉ. राठोड यांचे स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. श्री.बिनवडे यांची पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांनी कोरोनाकाळात जिल्ह्यात चोख जबाबदार पार पाडली. त्यामुळे कोरोना संक्रमण नियंत्रणात आले. श्री.बिनवडे यांच्या जागी मुंबईचे अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक डॉ.विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आल्याने आदेश मंगळवारी (ता.१३) शासनाने काढले होते. त्यानंतर बुधवारी डॉ. राठोड यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे.beed's son vijay rathod become new district collector of jalna glp88

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणीच पाणी

डॉ. विजय राठोड हे २०१४ च्या बॅचचे सनदी अधिकारी असून ते बीड जिल्ह्यातील गेवराई Gevrai येथील रहिवासी आहेत. जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वी डॉ. राठोड यांनी अमरावती Amravati जिल्ह्यातील दर्यापूर येथे उपविभागीय अधिकारी, आदिवासी विकास विभागामध्ये प्रकल्प व्यवस्थापक, धारणी (मेळघाट) Melghat येथे उपविभागीय अधिकारी म्हणून तर गडचिरोली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी काम केलेले आहे. डॉ. विजय राठोड यांनी मीरा भाईंदर येथील महापालिकेमध्ये आयुक्त म्हणूनही यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडली आहे.

loading image