
पृथा वीर
छत्रपती संभाजीनगर : एखाद्या शहराचे नाव म्हणजे तिथला वारसा, त्या शहराचा इतिहास असतो. औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले. तथापि, या शहराशी संभाजी महाराजांचे काय नाते होते, असा प्रश्न अनेकांना पडतो. छत्रपती शंभूराजे या शहरात किती वेळा आले, येथे काय काय केले, याच्या नोंदी इतिहास अभ्यासकांनी समोर आणल्या आहेत. आग्रा येथे जाताना अवघ्या ९ वर्षांचे शंभूराजे हे वडील छत्रपती शिवाजी महाराजांसोबत काही दिवस या शहरात वास्तव्याला होते. या शहरात राहून संभाजी महाराजांच्या गुप्तहेराने बेगमपुरा येथे राहून सैनिकांची गुप्तपणे भरती केली होती. अशा घडामोडी, घटनांचे शहर साक्षीदार आहे.