Tractor Accident: दुचाकीस्वार दांपत्यावर ट्रॅक्टरची भीषण धडक, पती ठार, पत्नी गंभीर जखमी
Dharashiv News: धाराशिव तालुक्यातील बेंबळी शिवारात दुचाकीस्वार पती-पत्नीवर ट्रॅक्टरने मागून धडक दिल्याने गोरोबा कोकरे यांचा मृत्यू झाला तर पत्नी अनुसया कोकरे गंभीर जखमी झाली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
धाराशिव : दुचाकीस्वार पती-पत्नीला ट्रॅक्टरने मागून धडक दिल्याने पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना तालुक्यातील बेंबळी शिवारात संगम हॉटेलसमोर घडली.