esakal | फेसबुक, ट्विटरवरील कमेंट्स डिलीट करून या! PMO चा फोन अन् मंत्रीपद...
sakal

बोलून बातमी शोधा

bhagwat karad

अत्यंत गोपनीयता बाळगत पंतप्रधान कार्यालयात बोलावले गेले व डॉ. कराड यांची केंद्रीय अर्थराज्यमंत्रिपदी वर्णी लागली

फेसबुक, ट्विटरवरील कमेंट्स डिलीट करून या! PMO चा फोन अन् मंत्रीपद...

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद: ‘हॅलो डॉ. भागवत कराडजी बात कर रहे है क्या?’ ‘‘मै ‘पीएमओ’ से संतोषजी बात कर रहा हूँ. किसीसे बात नहीं करना, मीडिया से भी नहीं...तुरंत दिल्ली चले आओ, प्रधानमंत्रीजी और नड्डा साहबने बुलाया है. आते समय पिछले आठ दिनों की, फेसबुक, ट्विटरपर किये गये कमेंट डिलीट करके आओ,’’ असा फोन डॉ. भागवत कराड यांना आला. त्यानंतर त्यांनी रातोरात दिल्ली गाठली. एक दिवस वाटही पाहिली पण कुणाकडूनच प्रतिसाद नव्हता! फोन फेक होता की काय? असाही प्रश्‍नही त्यांच्या मनात आला, पण नंतर अत्यंत गोपनीयता बाळगत पंतप्रधान कार्यालयात बोलावले गेले व डॉ. कराड यांची केंद्रीय अर्थराज्यमंत्रिपदी वर्णी लागली.

भाजप प्रदेश उपाध्यक्षपद व मराठवाडा विकास मंडळाची जबाबदारी... बस्स! आता आपला एवढाच प्रवास. यापुढे आपल्याला काही भेटणार नाही असे डॉ. भागवत कराड यांना वाटत होते; पण त्यांच्या पुढ्यात काही सर्वोच्च लिहून ठेवले होते त्याची यत्किंचितही त्यांना कल्पना नव्हती. ‘पीएमओ’ कार्यालयातून संतोषजी यांचा पाच ऑगस्टला रात्री फोन आल्यानंतर त्यांनी पत्नी डॉ. अंजली यांच्यासह तत्काळ आधी पुणे व सकाळी दिल्ली गाठली. सहा ऑगस्टला सकाळपासून ‘पीएमओ’ कार्यालयात काहीच हालचाल नव्हती. कुणाकडून विचारणा वा कॉलही नाही. त्यांना वाटले की आलेला कॉल फेक होता की काय? खात्रीसाठी त्यांनी परत त्याच क्रमांकावर कॉल केला तेव्हा परत तेच सांगण्यात आले. त्यानंतर सात ऑगस्टला सकाळी कराड यांना पीएमओ कार्यालयात बोलावण्यात आले. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिपदी निवड झाल्याचे सांगितले. उपस्थितांत डॉ. कराडांनाही आरोग्य विभाग मिळेल असे सुरुवातीला वाटले, पण बोलावण्यात आलेल्यांत तीन डॉक्टर होते त्यापैकी डॉ. भारती पवार एक होत्या. त्यांची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रिपदी व डॉ. कराड यांची केंद्रीय अर्थराज्यमंत्रिपदी वर्णी लागली.

हेही वाचा: लोअर दूधनाचे सोळा दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

...म्हणून मला केंद्रीय राज्यमंत्रीपद

राज्यसभेचा अजेंडा यायचा तो पाहत होतो. त्यातील प्रश्‍न व इतर गोष्टींबाबत रोज दोन पुरवणी प्रश्‍न तयार करायचो. अभ्यास करायची सवयच होती. अजेंड्यात दोन आरोग्याची बिले होती. संसदीय समितीने डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा करून अनुमती दिली. एक बिल मांडल्यानंतर सभागृहात उपराष्ट्रपतींसह सर्वांनी कौतुक केले. मराठवाड्यातील आठ प्रश्‍न मांडले. या अभ्यासामुळेच माझी केंद्रीय राज्यमंत्रिपदी वर्णी लागली, असे डॉ. कराड यांनी सांगितले.

loading image
go to top