bhatkheda lake water
sakal
अंबड - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील भाटखेडा येथील पाझर तलाव पाणी टंचाईवर मात करत दुष्काळात ग्रामस्थ, शेतकरी व पशुपालक यांच्यासाठी वरदान ठरला आहे. निसर्गाने अवकृपा केल्याने यंदा भरपावसाळ्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही.
यामुळे शेतशिवारातील ओढे, नदी, नाले पाण्यावाचून कोरडेठाक पडले आहे. यामुळे पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. कुपनलिकेत पाणी शिल्लक राहिले नाही. पाझर, लघु तलाव, मध्यम प्रकल्प पूर्णपणे कोरडेठाक पडले आहे.यामुळे पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.