देगलूर - घरकुल मंजुरीच्या प्रस्तावासाठी चार हजाराची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला एलसीबीने रंगेहात पकडले असून ही कार्यवाही बुधवारी ता. १९ रोजी एलसीबी पथकाने पंचायत समिती परिसरात केल्याने खळबळ उडाली आहे. भायेगाव सजयाचे ग्रामसेवक वामन बिरादार यांना एलसीबीने तात्काळ अटक करून त्यांना नांदेडला हलविले आले आहे.