

Jalna News
esakal
भोकरदन: शहरातील पंचायत समितीच्या पाठीमागील परिसरात अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर नागरिकांचा संताप अनावर झाला. ‘आमची पिढ्यानपिढ्यांची घरे का पाडली’, असा सवाल करत नगर परिषदेत जाब विचारायला गेलेल्या सात जणांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याने प्रकरण अधिकच चिघळले आहे.
एकाला नोटीस देऊन प्रत्यक्षात पाच घरे पाडल्याचा आरोप होत असून, महाराष्ट्रदिनी नगर परिषद कार्यालयात जोरदार गोंधळ उडाला.