esakal | भोकरदन : सैराट प्रेमीयुगुल वर्षभरानंतर ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेमीयुगुल

भोकरदन : सैराट प्रेमीयुगुल वर्षभरानंतर ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोकरदन : वर्षभरापूर्वी सैराट झालेल्या प्रेमीयुगुलाला भोकरदन पोलिसांनी श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले आहे. दोघांनाही जालना येथील न्यायालयासमोर उभे केले, न्यायालयाने तरुणीला तिच्या तीन महिन्यांच्या बालकासह सुधारगृहात तर तरुणाची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.

हेही वाचा: लातूर : वीस वर्षीय तरुणाचा सीना नदीत गणेश विसर्जन करताना मृत्यू

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून सागर ढगे (रा.मिसारवाडी, औरंगाबाद) याने पळवून नेले होते. या प्रकरणात भोकरदन पोलिस ठाण्यात सागर ढगे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मागील एका वर्षांपासून हे सैराट जोडपे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. मात्र, (ता.१२ सप्टेंबरला हे जोडपे श्रीरामपूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी एक पथक नेमले व या जोडप्याचा तपास सुरू केला.

हेही वाचा: हिंगोलीत मागील चोविस तासात ३.४० मिलिमीटर पावसाची नोंद

श्रीरामपूर येथे हे जोडपे भाड्याने खोली घेऊन राहात असल्याचे समजले. त्यानुसार या पथकाने सागर ढगे व तसेच १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. त्यांना एक ३ महिन्याचा मुलगा सुध्दा झाल्याचे समोर आले आहे. पोलिस पथकाने या सर्वांना भोकरदन पोलिस ठाण्यात आणले व जालना येथील न्यायालयात हजर केले, न्यायालयाने तरुणीची सुधारगृहात तर सागर ढगे याची जिल्हा कारागृहात रवानगी केली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे यांनी दिली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक कापुरे, एस. के.लोखंडे, जी.जे.सातवण,एन. पी.थिटे यांचा समावेश होता.

loading image
go to top