esakal | लातूर : वीस वर्षीय तरुणाचा सीना नदीत गणेश विसर्जन करताना मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

latur

लातूर : वीस वर्षीय तरुणाचा सीना नदीत गणेश विसर्जन करताना मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरूर अनंतपाळ (जि.लातूर) : साकोळ (ता.शिरूर अनंतपाळ) येथील तरुण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना सीना नदी पात्रात बुडून मृत्यू पावल्याने साकोळ गावावर शोककळा पसरली आहे.

साकोळ येथील सौरभ सुभाष बेंबळगे (वय20) हा मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील विशाल निर्मिती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कामाला होता. केवळ तीन महिन्यापूर्वीच तो या कंपनीमध्ये कामाला लागलेला होता. शनिवारी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी तो आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत गेला होता.

हेही वाचा: पोलीस अधीक्षकांचे अधिकार स्थानिक पातळीच्या अधिकाऱ्यांना दिले

गणपतीचे विसर्जन करतेवेळी त्याचा पाय निसटून तो पाण्यामध्ये पडला व वहात जाऊन नदीपात्रात असलेल्या भोवऱ्यामध्ये अडकून तो दिसेनासा झाला. कोळेगाव आष्टा येथील बॅरेज सध्या भरलेले असून पाणी अतिशय वेगाने नदीपात्रात वाहत होते. या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी तात्काळ शोधाशोध सुरू केली पण त्यांना त्यात यश आले नाही. रविवारी परत स्थानिक मच्छीमार व अनुभवी पोहणाऱ्यांनी सौरभचा सीना नदी मध्ये शोध घेतला पण सौरभ चा शोध लागला नाही. सोमवारी अखेर एस डी आर एफ च्या जवानांनी नदीपात्रामध्ये सौरभचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह मिळून आला.

अंध मातापित्यांचा आधार हिरावला

सौरभचे मातापिता दोघेही अंध आहेत, सौरभ हाच त्यांचा आधार होता. अंध डोळ्यांनी मातापिता दोघेही सुखाचे स्वप्न पहात असतानाच हा आघात झाल्याने त्यांच्या जीवनात ऊगवणारी सुखाची पहाट काळरात्रीत बदलली आहे. सौरभचा आधारच हिरावला गेल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये परत एकदा अंधकार दाटून आला आहे. सौरभचे गेल्या वर्षीच लग्न झालेले होते.त्याच्यामागे पत्नी, अंध माता-पिता व एक लहान बहीण आहे. सौरभवर सोमवारी सायंकाळी उशिरा साकोळ येथे शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

loading image
go to top