esakal | भोकरदन तालुक्यात यंदा 182 गणेश मंडळांनी केली गणरायाची स्थापना
sakal

बोलून बातमी शोधा

182 गणेश मंडळांनी केली गणरायाची स्थापना

भोकरदन तालुक्यात यंदा 182 गणेश मंडळांनी केली गणरायाची स्थापना

sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : तालुक्यात यंदाही कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा होत आहे. शुक्रवारी (ता.10) घरोघरी गणरायाची भक्तिभावाने स्थापना करण्यात आली असून, तालुक्यातील तीन पोलिस ठाण्यातंर्गत 182 सार्वजनिक गणेश मंडळींनी गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. तर 60 गावांत 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

हेही वाचा: पाटबंधारे विभागाच्या बेजबाबदारपणामुळेच पुराचे संकट

मागील वर्षांपासून सगळेजण कोरोनाच्या संकटात जगत आहे. आद्यपही कोरोनाचे संकट टळले नसल्याने यावर्षीही अनेक निर्बंधातच गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. तालुक्यात शनिवारी (ता.11) पर्यंत 182 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना करण्यासाठी परवानगी घेतली असून, भोकरदन पोलिस ठाण्यातंर्गत 50 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे. त्यात भोकरदन शहरातील 15 गणेश मंडळांचा समावेश असून,

हेही वाचा: ढगफुटीच्या हिटलिस्टवर महाराष्ट्र

पारध पोलिस ठाण्यातंर्गत 67 व हसनाबाद पोलिस ठाण्यातंर्गत 65 गणेश मंडळे आहेत. भोकरदन अंतर्गत 23, हसनाबाद 21 आणि पारध अंतर्गत 16 असे एकूण 60 गावांत एक गाव एक गणपतीची आदर्श संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांनी 'सकाळ'ला दिली.

loading image
go to top