Zhupedia App Scam
esakal
भोकरदन : भोकरदन तालुक्यात 'झुपेडिया' या ॲपच्या (Zhupedia App Scam) मोहजाळ्यात हजारो नागरिक सापडले असून, कोट्यवधी रुपयांचा चटका बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फक्त मोजक्याच लोकांनी या ॲपमधून पैसे कमावले, तर बहुसंख्य लोकांनी हव्यासापोटी आपले मेहनतीचे पैसे गमावले आहेत. दरम्यान, सदरील अॅप शुक्रवारी (ता. १२) अचानक बंद झाले आणि गावागावांत या प्रकरणाची चर्चा रंगली.