students
sakal
- धनंजय शेटे
भूम - भूम आगाराचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भूम येथून वारेवडगाव, कासारी, भोगलगाव शाळेचे विद्यार्थी तब्बल दोन तासापासून एसटी नसल्याने ताटकळत बस्थानकामध्ये थांबावे लागले.
विद्यार्थ्यांची शाळा चार वाजता सुटल्यानंतर दररोज ४.१५ वाजता एसटी बस सुटते. मात्र सायंकाळी ६.४५ वाजता सोडल्यामुळे तब्बल दोन तास विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करत बस स्थानकामध्ये बसावे लागले.