

Krishna Marathwada Lift Irrigation Project Worker Dies in Bhoom Pipeline Accident Villagers Demand Compensation and Justice
esakal
भूम: कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत भूम तालुक्यातील उळूप येथे सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामादरम्यान पोकलेन अंगावर गेल्याने अशोक बाळासाहेब सानप (वय ३०) या शेतकरी मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दि.२ नोव्हंबर रोजी दुपारी दीड वाजनच्यो वेळीस ही घटना घडली आहे. या घटनेमुळे उळूप गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवायचा नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी घेतली आहे.