
उस्मानाबाद : भूम (Bhoom) येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर (Sub Divisional Officer) यांनी कोतवाल विलास जानकर यांच्या हस्ते एक लाखांची लाच (Bribe) घेतल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Burau) श्री.जानकर यास रंगेहात पकडले असुन मनिषा अरुण राशिनकर (वय ४५), उपविभागीय अधिकारी, उपविभाग भूम, विलास नरसींग जानकर (वय ३२), कोतवाल, देवळाली सज्जा प्रतिनियुक्ती उपविभागीय अधिकारी कार्यालय भुम यांच्यावर कारवाई केली आहे. या दोघांनी लाचेची मागणी करुन विना कारवाई (Osmanabad) वाहने वाळु वाहतुक करण्याचे आमिष दिले होते. यासाठी तब्बल एक लाख दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती ९० हजार रुपये व २० हजार रुपये आरोपी विलास जानकर याच्या हस्ते स्विकारले.(bhoom sub divsional officer caught in anti corruption trap osmanabad news glp88)
तक्रारदार यांचा एक टिप्पर व त्याच्या पाहुण्यांचा जेसीबी व तीन ट्रॅक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी आरोपी मनिषा राशिनकर व विलास जानकर यांनी तक्रारदार याच्याकडे प्रती महिना एक लाख दहा हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती ९० हजार रुपयाची लाच मागणी केली होती. त्यापैकी २० हजार रुपये लाच विलास जानकर यांच्या हस्ते स्वीकारल्याने त्यांच्या विरुद्ध भुम पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सापळा अधिकारी म्हणून पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी काम पाहिले. उस्मानाबाद सापळा पथकामध्ये पोलिस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.