Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Drought And Storm Flatten Five Acres Of Sugarcane In Bhoom: दुष्काळात जपलेला ऊस वादळी पावसाने जमीनदोस्त; पाठसांगवीतील शेतकऱ्याचे पाच एकर पीक उद्ध्वस्त, पंचनामा व तातडीच्या भरपाईची मागणी
Bhoom Farmer Struggles With Drought Then Storm Winds Flatten Five Acres Of Sugarcane Causing Major Crop Damage

Bhoom Farmer Struggles With Drought Then Storm Winds Flatten Five Acres Of Sugarcane Causing Major Crop Damage

sakal

Updated on

-धनंजय शेटे

भूम : भूम तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आधीच दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. उपलब्ध पाण्यावर पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच आता वादळी पावसाने उरलेल्या पिकांनाही तडाखा दिला आहे. पाठसांगवी येथील शेतकरी शशीराज माने यांनी दुष्काळी परिस्थितीत मोठ्या कष्टाने आणि खर्च करून जपविलेला तब्बल पाच एकर ऊस २० सप्टेंबर रोजी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः भुईसपाट झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com