esakal | वसमतमध्ये उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय इतर कामाचे भूमिपूजन
sakal

बोलून बातमी शोधा

वसमत भुमिपुजन

वसमतमध्ये उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांचे डेडिकेटेड कोविड रुग्णालय इतर कामाचे भूमिपूजन

sakal_logo
By
संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : आमदार राजू नवघरे यांच्या प्रयत्नाने वसमत येथे उपजिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालय येथे साडेसात कोटी रुपयाच्या बांधकामाचे भूमिपूजन माजीमंत्री तथा सहकारी साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते सोमवार ( ता. तीन ) करण्यात आले.

आमदार राजू नवघरे यांनी उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे ५० खाटाचे डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालय बांधकामासाठी चार कोटी ३६ लाख ६५ हजार रुपये तसेच महिला रुग्णालय वसमत येथे औषधी भांडार गृह व वैद्यकीय अधिकारी कार्यालय इमारतीचे बांधकामासाठी तीन कोटी 10 लाख रुपये असा सात कोटी ४६ लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला.

हेही वाचा - रमजान विशेष : लैलतुल कदर पवित्र रात्रीची इबादतने रमजानच्या तिसऱ्या पर्वास प्रारंभ

सोमवारी सदरील कामाचे भूमिपूजन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब त्यांच्या हस्ते संपन्न झाले. कोविडच्या दुसऱ्या लाटेत शासकीय रुग्णालयातील उणीवा स्पष्ट झाल्या होत्या. रुग्णांना बेड, औषधी, इंजेक्शन व वैद्यकीय स्टाफ अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तर रुग्ण सेवा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आमदार राजू नवघरे यांच्याकडे आल्या होत्या. त्यांतर आमदार नवघरे यांनी सतत पाठपुरावा करुन सदरील निधी मिळवला. उपजिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालय येथे संपन्न झाले.

भुमिपुजन कार्यक्रम वेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व आमदार राजू नवघरे यांच्यासह उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसिलदार अरविंद बोळंगे, प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सनाउलाखॉंन पठाण, डॉ. चव्हाण, अंबादास भोसले, माजी नगराध्यक्ष सुनिल काळे, माजी उपनगराध्यक्ष शेख खैसर भाई, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू, नगरसेवक दिलीप भोसले, चंद्रकांत बागल, बाळूमामा ढोरे, जीजामामा हरणे, गोरख पाटील, त्र्यंबक कदम, विश्वनाथ फेगडे. दीपक कातोरे, गजानन ढोरे, दिपक जवळेकर, श्री इटणकर आदींची उपस्थित होती. यावेळी आमदार राजू नवघरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्थानिक विकास निधीतूनसुद्धा कोवीड करिता एक कोटी देणार असल्याचे सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image