
रमजान विशेष : लैलतुल कदर पवित्र रात्रीची इबादतने रमजानच्या तिसऱ्या पर्वास प्रारंभ
नांदेड : पवित्र रमजान मासाचे वीस रोजे व दोन पर्व पूर्ण होऊन 'लैलतुल कदर ' या पवित्र बडी रातचया इबादतीने रमजान मासाचा तिसरा व अंतिम पर्व प्रारंभ झाला आहे. याअतुलनीय पवित्र रात्रीच्या इबादतीने ईशवराची असीम कृपया प्राप्त करण्यासाठी सर्व अबालवृद्ध भाविक सज्ज झाले आहेत.
अल्लाहने रमजान हा माझा महिना आहे. यामध्ये तुमच्यावर पूर्ण महिन्याचे रोजे अनिवार्य करण्यात आले आहे. असा अल्लाहने फर्मावले आहे. तसेच या महिन्यात पवित्र कुराणचे अवतरण झाल्यामुळे या महिन्यास अनन्य साधारण असे महत्व मध्ये प्राप्त झाले आहे. या महिन्यातील पवित्र रात्रीला लैलतूला खदर वा लैलतूल मुबारका असे ही संबोधले जाते. खदर हा शब्द तकदीरशी आहे. अल्लाह या रात्री आगामी काळात होणाऱ्या सर्व बाबीचा लेखा जोखा याच रात्री निश्चित करुन आपल्या दूताकडे सुपूर्द करतॊ. म्हणूनच या पवित्र रात्री कधी नाही ते अल्लाहचे सर्व फरिश्ते (दूत )अल्लाहची कृपा उधळण्यासाठी अवतरित होत असतात. पहाटेच्या नामजे फजरपर्यंत हे असीम कृपा फरिश्ते उधळत असतात. या रात्रीच्या इबादतीस अतुलनीय मोबदला अल्लाह प्रदान करतो. केवळ वेळ वाया घालून रात्रीचे जागरण अल्लाहला अपेक्षित नाही.
हेही वाचा - आयपीएस आधिकारी दिपांशू काबरा यांनी या चोराचा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.
बाजारात व इतरत्र फिरणे गप्पागोष्टीत वेळ घालवणे अल्लाहस पसंत नाही. या रात्रीच्या इबादतीस अल्लाहने हजार रात्रीच्या इबादती पेक्षाही श्रेष्ठ ठरविले आहे. या रात्रीस जागरण करुन तरावीह, नफील नमाज, सालातुत तसबही, सालात तहाजूत, जिक्र, (जाप ) अस्तगफार, क्षमा याचना, दुआ, कुराण पठण, दान पुण्य, आदी विधीच्यामाध्यमाने रात्रीला सच्च्या मनाने अल्लाहाच्या रजासाठी इबादत केल्यास या इबादतीस अल्लाह हजार रात्रीच्या इबादती इतकं पुण्य प्रदान करणार आहे. अश्या या पवित्र रात्रीचे आगमन रमजान मासच्या वीसव्या रोजपासून संध्याकाळी प्रारंभ होते. ईशवराने या पवित्र रात्रीबाबत निश्चित विधान केलेले नाही. भाविकांना जास्तीत जास्त इबादतिची संधी मिळावी व कोनीही यापासून वंचित राहू नये यासाठी रमजान मास च्या 21, 23, 25 व 27 अशा' तारखेच्या 'ताक ' (विशेष )रात्रीला 'लैलतूल खदर ' या पवित्र रात्रीला प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, तिचा शोध घ्यावा जेणेकरुन अल्लाह आपल्या भाविकांना असीम कृपा प्रदान करेल असा अल्लाहचा फर्मान आहे. म्हणजेच या सर्व रात्रीस लैलतूल खदर समजूनच आपली इबादत करावी अशी अपेक्षा असते. म्हणून पुढील पर्वात या पवित्र रात्रीचे पावित्र्य लपवून ठेवले आहे. या रात्रीच्या इबादतीपासून वंचित राहणारा व मुकणारा सर्वात जास्त कमनशिबी असेल असेअल्लाहने म्हंटले आहे.
सोमवार ता. 3 मे संध्या काळपासून रमजान मासच्या समारोपीय पर्वास व लैलतूल खदर या अतुलनीय व पवित्र रात्रीच्या इबादतचा पर्व सुरु झाला आहे. सामान्य काळात या पर्वात शहरातील मशिदी भाविकांनी भरुन जायची. परंतु लॅाकडाऊन व महामारीच्या प्रशासनाच्या नियोजनामुळे मुस्लिम अबालवृद्ध भावीक या पवित्र इबादती आप आपल्या घरीच राहून अदा करीत आहेत. लॉकडाऊन व कोविड- 19 या मुळे भाविकांच्या इबादतीच्या उत्साहात कमतरता आलेली दिसून येत नही. उलट या महामारीवर मात करण्यासाठी ईश्वराकडे साकडे घालण्याची सवर्ण संधी या समारोपीय पर्वात भाविकांना मिळाली आहे. याचा भाविक पुरेपूर लाभ घेत आहेत व जगभरातून या महामारीचा प्रकोप संपुष्टात आणावा अशी सर्वजण ईश्वर चरणी प्रार्थना करीत असल्याचे दिसून येत आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
Web Title: Ramajan Special Laylat Al Qadr Begins With The Third Night Of
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..