

Bidkin Industrial Corridor Residents Protest Over Pending Jobs Water Supply Bypass and Ring Road Issues Despite Ministerial Orders
esakal
-रविंद्र गायकवाड
बिडकीन : एकीकडे बिडकीन परिसरात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) अंतर्गत कोट्यवधींची औद्योगिक गुंतवणूक आणि उद्योगांचे जाळे विस्तारत असताना दुसरीकडे स्थानिक नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना मात्र अद्यापही अपेक्षित न्याय मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रलंबित प्रश्नांच्या अंमलबजावणीबाबत निर्देश दिल्यानंतरही स्थानिक पातळीवर कामांना अपेक्षित गती मिळत नसल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. त्यामुळे आता निवेदने आणि पाठपुराव्यापलीकडे जाऊन मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या दरबारात धडक देण्याचा निर्धार बिडकीन DMIC समितीच्या बैठकीत करण्यात आला.