
Man Arrested with Sword, Axes, and Airgun in Paithan for Violating Arms Ban
Sakal
रविंद्र गायकवाड
बिडकीन : डोंगरू नाईक तांडा,ता.पैठण येथे दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीस धारदार हत्यारांसह बिडकीन पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह मुंबई पोलीस अधिनियम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक संभाजी लहूराव झिंजुर्डे (वय 35, नेमणूक पोलीस ठाणे बिडकीन) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भगवान देविदास चव्हाण (वय 38, रा. डोंगरू नाईक तांडा, ता. पैठण) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.