Delhi Lathicharge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा बिडकीनमध्ये तीव्र निषेध; निलजगाव फाटा ते पोलिस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांची पायी रॅली

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जविरोधात बिडकीनमध्ये संतप्त विद्यार्थ्यांची पायी रॅली; शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
The protesters demanded an impartial inquiry into the alleged incidents, action on examination irregularities and accountability from the Union Education Minister.

The protesters demanded an impartial inquiry into the alleged incidents, action on examination irregularities and accountability from the Union Education Minister.

Sakal

Updated on

रविंद्र गायकवाड

बिडकीन : दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कथित लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर आणि मारहाण झाल्याच्या निषेधार्थ बिडकीनमध्ये गुरुवारी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक रस्त्यावर उतरले. आदिवासी चक्रीवादळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्यच्या नेतृत्वाखाली निलजगाव फाटा येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. त्यानंतर निलजगाव फाटा ते बिडकीन पोलिस ठाणे अशी पायी रॅली काढून सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेळके यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com