
परभणी : मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांने आपल्या कुटुंबीयांसह रविवारी (ता.१२) रात्री सेलू (जि.परभणी) तालुक्यात प्रवेश केला. परंतु, महसूल व पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर त्या अधिकाऱ्यांसह कुटुंबीयांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना सेलू शहरात वास्तव्य करण्यास मनाई करीत जिल्ह्याच्या सीमेवर नेऊन सोडले.
शिक्षण विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने मुंबईतील अन्य एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे पत्र घेऊन रविवारी (ता.१२) रात्री सातोना रस्त्यावरील जिल्ह्याची सीमा ओलांडून सेलूत प्रवेश केला. स्वतःसह सात जणांचे हे कुटुंबीय सेलू शहरात पोचल्यानंतर काहींना त्या गोष्टीची कुणकूण लागली.
हेही वाचा - गावाकडे परतण्यासाठी वडील गेल्याचा रचला बेबनाव
सेलूत वास्तव्यास नकार
मुंबईतील वरळी भागातून हे कुटुंबीय एका पत्राच्या आधारे सेलूपर्यंत आल्याची माहिती कळाल्यानंतर सतर्क नागरिकांनी तत्काळ ही बाब तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तेथील तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांनी या कुटुंबीयांची तत्काळ वैद्यकीय तपासणी केली. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तातडीने त्या या कुटुंबास सेलू शहरात वास्तव्य करण्यास स्पष्ट नकार देऊन त्यांना जिल्ह्याच्या सीमेवर नेऊन सोडण्याचे आदेश दिले. तालुका प्रशासनाने या कुटुंबीयांना सोमवारी पहाटे सातोना येथील सीमेवर सोडले.
‘त्या’ युवकांसह केले क्वारंटाइन
लॉकडाऊनमुळे मुंबईहून परभणीत आलेल्या एका युवकाची तपासणी करून त्याला जिल्हा रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले. हा युवक तब्बल ६०० किलोमीटर पायी चालून आला. याची माहिती महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण जोगदंड यांनी या युवकास जिल्हा रुग्णालयात आणून त्याची तपासणी केली व त्याला क्वारंटाइन केले.
हेही वाचा - बँकांबाहेरील गर्दी हटता हटेना
नव्याने २० संशयित दाखल
परभणी जिल्ह्यातील कोरोना संशयितांची संख्या ३४० वर गेली असून २५८ जणांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, सोमवारी (ता. १३) नव्याने २० संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. कोरोना विषाणूसंदर्भात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय परभणी येथे ३४० रुग्णांची नोंद झाली आहे. त्या पैकी २५८ रुग्ण निगेटिव्ह असून २९ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आजपर्यत १७ स्वॅब एनआयव्ही व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांनी तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. ३०४ स्वॅब पैकी ता. १३ एप्रिल रोजी एकूण २० संशयितांचा स्वॅब तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे पाठविण्यात आला आहे. नव्याने २० संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.