
छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय शिक्षण मंत्रालय आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, आयुष यांच्या आधिपत्याखालील सरकारी वैद्यकीय व दंत चिकित्सा महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमधील गट-क आणि अतिशैक्षणिक संवर्गातील ११०७ पदांच्या सरळसेवा भरतीसाठी स्पर्धा परीक्षा ऑनलाइन अर्ज प्रक्रिया गुरुवारी (ता. १९) सायंकाळी पाच वाजेपासून सुरू होत आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ जुलै पर्यंत आहे.