Crop Insurance Issue : मंजुरीच्या घोषणा मोठ्या; पण शेतकऱ्यांच्या खात्यात ‘शून्य’च, देगलूरातील १७ हजार १५१ शेतकरी पीक विम्यापासून वंचित

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल ८८४.७१ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाल्याच्या घोषणा शासनाकडून करण्यात आल्या. मात्र....
Crop Insurance

Crop Insurance

sakal
Updated on

देगलूर - प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल ८८४.७१ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाल्याच्या घोषणा शासनाकडून करण्यात आल्या; मात्र प्रत्यक्षात हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही. देगलूर तालुक्यातील तब्बल १७ हजार १५१ शेतकरी विमा रकमेपासून वंचित राहिल्याने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून शुक्रवारी (ता. १५) देगलूर येथे शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com