esakal | हिंगोली पोलिसांना मोठे यश:  सशस्त्र दरोड्याचा ४८ तासात छडा, ११ अट्टल दरोडेखोर अटक, १० लाखाचा मुद्देमाल जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हिंगोली शहरालगत असलेल्या सुरानानगरात सोमवारी (ता. आठ) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास १२ ते १३ अज्ञात चोरटयांनी जवान आर. व्ही. त्रिमुखे यांच्या घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडुन त्यापैकी सात ते आठ जणांनी घराचे दरवाज्याचे कड़ी कोंडे तोडून आत प्रवेश केला.

हिंगोली पोलिसांना मोठे यश:  सशस्त्र दरोड्याचा ४८ तासात छडा, ११ अट्टल दरोडेखोर अटक, १० लाखाचा मुद्देमाल जप्त 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोलीतील सुरानानगरातील एसआरपीएफ जवानाचे घरी सशस्त्र दोडयाचा ४८ तासात छडा लावत नदीनाल्यातून पाच कि.मी. पाठलाग करुन ११ अट्टल दरोडेखोर अटक करुन १० लाख ४९ हजार रुपया मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे यांनी संयुक्तपणे केली असल्याची माहिती पोलिस प्रशासनातर्फे शुक्रवारी (ता. १२) पत्रकार परिषदेत देण्यात आला.

हिंगोली शहरालगत असलेल्या सुरानानगरात सोमवारी (ता. आठ) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास १२ ते १३ अज्ञात चोरटयांनी जवान आर. व्ही. त्रिमुखे यांच्या घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडुन त्यापैकी सात ते आठ जणांनी घराचे दरवाज्याचे कड़ी कोंडे तोडून आत प्रवेश केला. घरातील त्यांची आई, वडील व वहिणी यांना तलवारीचा धाक दाखवुन सोन्याचांदीचे दागीणे, मोबाईल असा एकूण एक लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेल्या वरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अमोल त्रिमुखे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल  झाला होता. 

हेही वाचा हिंगोली जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला वेग, ३२ ठिकाणी १३ हजार १९७ जणांचे लसीकरण

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक उदय खंडेराय, ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. आर. बंदखडके यांचे संयुक्तरित्या गुन्हा तात्काळ उघड करण्यासाठी त्यांना योग्य त्या सूचना देउन गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक एस. एस. घेवारे, ग्रामिण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राहूल तायडे,  के. डी. पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथक तयार करण्यात आले. सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या दृष्टीकोणातून सायबर सेल, फिंगर प्रीन्ट, डॉगस्कॉडच्या मदतीने सदर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी तपासाचे आदेश दिले. 

पथकांना मिळालेल्या माहिती प्रमाणे व खबऱ्यांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील अज्ञात दरोडेखोरांचा माग काढून त्यांना जालना जिल्ह्यातील चितळी पुतळी, विरेगांव तांडा, पिंप्री डुकरे येथे जावून गावकऱ्यांच्या व खबऱ्यांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील अटल दरोडेखोरांची माहिती घेऊन त्यांना मोठ्या शिताफीने व नदी नाल्यातून व उसाच्या फडातून आरोपींचा पाठलाग करुन गुन्ह्यातील फिर्यादी यांना न्याय देण्याच्या उद्देशाने त्यांना ताब्यात घेउन त्यांना विश्वासात घेउन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने व गुन्ह्यात वापरलेले हत्यार, सोन्या, चांदीचे दागीणे, तिन एलईडी टिव्ही, मोटर सायकल व पिकअप असा एकुण दहा लाख ४९ हजाराचा मुददेमाल हस्तगत करण्यात करुन कोल्हापुरे शिंदे रा. विरेगावतांडा, बाबासाहेब शिंदे, माधव शिंदे दोघे रा. विरेगाव, विनोद नामाने रा. चितळी, पुतळी, जि. जालना, जिवा जाधव रा. डुकरे पिंपरी जि. जालना, राहुल धोतरे रा. रेवकी बेवकी जि. बीड, विलास पवार रा. रामपुरी जि. बीड, भास्कर झाकने रा. विरेगाव, सुरेश पवार रा. मंगरुळ जि. जालना, पिकअप चालक मारोती पवार रा. विरेगाव, दिपक पवार रा. मंगरूळ जि. जालना यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामिणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. आर. बंदखंडके, उपनिरीक्षक आर. व्ही. तायडे,  एस. एस. घेवारे, के. डी. पोटे तसेच संतोष वाठोरे, भगवान आडे, संभाजी लेकुळे, गजानन पोकळे, अशोक धामणे, राजु ठाकुर, विठ्ठल काळे, चालक शेख मोहम्मद, श्री.  वाढवे, निलेश हलगे, जयप्रकाश झाडे, इरफान पठाण, सुमित टाले, रोहीत मुदीराज,  रमा ठोके तसेच पोलिस ठाणे मौजपुरीचे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. रामोड, उपनिरीक्षक माजीद, कुलदीप चव्हाण व त्यांच्या सहकारी तसेच मौजे बाबई, चितळी पुतळी, कवठा गावातील लोकांच्या मदतीने कार्यवाही करण्यात आली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image