जलवाहिनीच्या कामात असलेल्या कामगार व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने ट्रक मागे घेत अडकलेली दुचाकी काढण्यात आली.
-रविंद्र गायकवाड
बिडकीन : पैठण ते छत्रपती संभाजीनगर (Paithan to Chhatrapati Sambhajinagar) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. आज 11 च्या सुमारास निलजगाव फाट्यावरून निघालेल्या टेम्पोने दुचाकीला चिरडून जलवाहिनीच्या खोदलेल्या नालीवर हा टेम्पो अडकल्याने खळबळ उडाली.
बिडकीन येथील निलजगाव फाट्यावरून भरधाव वेगाने बसस्थानक परिसरात जात असलेला टेम्पो (क्रमांक एमएच ई ६२१४) चालकाने झालेली वाहतूक कोंडी (Traffic) सुरळीत करण्यासाठी टेम्पो चालूच ठेवला. टेम्पो चालू असल्यामुळे समोर उभ्या असलेल्या दुचाकीला (क्रमांक एमएच २० इटी ६८१४) चिरडून जलवाहिनीच्या खोदलेल्या नालीवर टेम्पो अडकला.
टेम्पो व दुचाकीस्वार हे दोघेही जलवाहिनीच्या कामात कंत्राटी कर्मचारी व अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. टेम्पो चालकाला टेम्पो विनावाहक पुढे चालला असल्याचे निदर्शनास आले असता, तातडीने टेम्पोवर ताबा घेत टेम्पो नालीत जाण्यापासून रोखला. घटनास्थळावर वाहनधारकांनी वाहने बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जलवाहिनीच्या कामात असलेल्या कामगार व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने ट्रक मागे घेत अडकलेली दुचाकी काढण्यात आली.
फारोळा येथील पुलाजवळ जलवाहिनीच्या पाइपलाईन फुटल्याची स्थितीत असल्याने दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहेत. वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे जनसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.