

Accident
sakal
परळी वैजनाथ - शहरातील बीड रोडवरील थर्मल परिसरातील ब्रिजवर शुक्रवारी (ता. ३१) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. पांडू वाघमारे (रा. शिवाजीनगर, परळी वैजनाथ) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.