परभणी जिल्ह्यात उर्जा विभागाची कोट्यावधीचे कामे प्रस्तावित

परभणी जिल्ह्यात आगामी काही दिवसात महावितरण व महापारेषण कंपनीची अनेक कामे प्रस्तावित केलेली आहेत.
परभणी महावितरणची अनेक कामे प्रस्तावीत
परभणी महावितरणची अनेक कामे प्रस्तावीत
Updated on

परभणी ः जिल्ह्यात ऊर्जा विभागाची कोट्यावधींची कामे प्रस्तावित आहेत. या कामामुळे आगामी काही दिवसात परभणी जिल्ह्यातील प्रकल्प कार्यान्वित होवून वीजग्राहकांच्या अखंडीत विजेचे स्वप्न पुर्णत्वास जाईल अशी आशा आहे. या प्रकल्पांतर्गत ऊर्जा विकास कामे, कृषीपंपांसाठी विद्युत पुरवठा, दलीत वस्तीमध्ये विद्युतीकरण व नवीन जोडण्या देण्याचे काम केले जाणार आहे. त्याच बरोबर सौर कृषी वीज वाहिनी प्रकल्पासाठी जागेची पाहणी करण्याचे काम देखील सुरु आहे.

परभणी जिल्ह्यात आगामी काही दिवसात महावितरण व महापारेषण कंपनीची अनेक कामे प्रस्तावित केलेली आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर या द्वारे जिल्ह्यातील विद्युत संदर्भातील अनेक अडचणी दुर होऊ शकतील असी आशा व्यक्त केली जात आहे. परभणी जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीतंर्गत मंजुर विविध विकास कामासाठी ८ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. त्याच बरोबर एससीपी योजनेतंर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेद्वारे २५८ लाभार्थांच्या कृषीपंपास विद्युत पुरवठा करणे, दलित वस्तीमध्ये विद्युतीकरण व नवीन वीज जोडण्या देण्याचे काम केले जाणार आहेत.

हेही वाचा - किनवट तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चालु असलेल्या महामार्गाच्या पुलांच्या कामादरम्यान निर्माण केलेल्या बाजुचे प्रासंगिक पुल वाहुन गेल्याने वाहतुक खोळंबली

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीद्वारे जागा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम होणार आहे. जिल्ह्यात असे २२.६९ मेगावॅटचे पाच प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहेत. महापारेषण कंपनीच्या वतीने १३२ व १३३ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांची जिल्ह्यात दोन ठिकाणी उभारणी करण्याचा प्रस्ताव आहे. त्याची क्षमता ५० मेगावॅट एवढी असणार आहे. जिंतूर तालुक्यातील बोरी व सेलू शहरात हे दोन उपकेंद्र प्रस्तावित आहेत. पूर्णा शहरात १३२, १३३ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांची २५ मेगावॅट क्षमता वाढविण्याचा ही प्रस्ताव आहे. ही कामे पूर्ण झाल्यास याचा जिल्हाला फायदा होणार असून त्याद्वारे वीजेच्या अनेक समस्या दुर होऊ शकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ही कामे आहेत प्रगतीपथावर

जिल्ह्यात महावितरणची चार कामे प्रगतीपथावर आहेत. त्यात एचव्हीडीएस योजनेतंर्गत शेतीपंप उर्जिकरणासाठी ६३४ नग दिले जात आहेत. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतंर्गत उर्जिकरणासाठी ५३९ नग दिले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेतंर्गत २.५० मेगावॅटचा एक प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. एचव्हीडीएस योजनेतंर्गत चाटोरी (ता.पालम) येथे २.५० मेगावॅटचे नवीन ३३, ११ केव्ही उपकेंद्रांचे कामही प्रगतीपथवार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com