esakal | बायोमेडिकल अभियंता सुनील कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे वाचले 14 रुग्णांचे प्राण

बोलून बातमी शोधा

कुलकर्णी परभणी

बायोमेडिकल अभियंता सुनील कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे वाचले 14 रुग्णांचे प्राण

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः नाशिक येथे ऑक्सीजन गळती झाल्यानंतर घटलेली घटना ताजी असतांनाच परभणीतही ऑक्सीजन प्लॅन्टचा पाईप फुटून ऑक्सीजन गळतीची घटना जिल्हा रुग्णालयात मंगळवारी (ता. 27) रात्री घडली होती. परभणीतील बायोमेडीकल अभियंता सुनील कुलकर्णी यांच्या समय तत्परतेने जिल्हा रुग्णालयातील 14 रुग्णांचा जीव वाचला. सलग तीन तास अथक मेहनत केल्यानंतर अखेर ऑक्सीजन प्लॅन्टची गळती बंद करण्यात यश आले.

परभणी जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन प्लॅन्ट उभारण्यात आलेला आहे. गतवर्षीच या प्लॅन्टचे लोकापर्ण झाले आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन व पोलिसांवरही अतिरिक्त ताण आलेला आहे. परंतू अश्या ही परिस्थितीत सर्व काही सुरळीत ठेवण्याचे अटोकाट प्रयत्न प्रशासनाच्यावतीने केले जात आहेत. एकीकडे रेमडेसिव्हिरचा तुटवडा, लसीची कमतरता असतांना दुसरीकडे जिल्ह्यात वाढलेला मृत्युदर ही ह्रदयाचे ठोके वाढवित आहे.

हेही वाचा - सेनगावमध्ये अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी दिला नकार; शेवटी मुख्याधिकाऱ्याने दिला मुखाग्नी

जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सीजन प्लॅन्टद्वारे जिल्हा रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सीजन पुरविला जातो. परंतू अचानक मंगळवारी (ता. 27) रात्री साडे आकरा ते बाराच्या दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन प्लॅन्टचा पाईप तुटून ऑक्सीजन गळती सुरु झाली. याची माहिती तेथे उपस्थित असणाऱ्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिली. खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्य सुरु केले.

सुनील कुलकर्णींच्या प्रसंगावधाने वाचले जीव

रुग्णालायातील ऑक्सीजन गळतीची माहिती जिल्हा रुग्णालयातील स्वप्नील कुलकर्णी या कर्मचाऱ्यांनी बायोमेडिकल अभियंता सुनील कुलकर्णी यांना दिली. सुनील कुलकर्णी हे व्हेटींलेटर व ऑक्सीजन जोडणीचे काम करतात. परभणी शहरातील बायोमेडिकल अभियंता सुनील कुलकर्णी या युवकाने

तातडीने धाव घेत ऑक्सीजनची गळती बंद करण्याचे महत्वपूर्ण काम केले. सुनील कुलकर्णी नांदेड येथील एचकेआर मेडिकल इंजिनिअरींगमध्ये संचालक म्हणून काम करतात. त्यांना 11 वर्ष फ्लिडवरील कामाचा अनुभव आहे. जिल्हा रुग्णालयातील पाईप लाईन ही आसीयुओ ते क्यॅज्युलटीपर्यंत जोडली गेली आहे. श्री. कुलकर्णी यांनी परिस्थितीचा अंदाज घेवून प्रथम बॉल वॉलचे काम 15 मिनिटात पूर्ण केले. त्यानंतर 90 टक्के ऑक्सीजन पुरवठा सुरळीत झाला. त्यांनंतर ऑक्सीजन प्लॅन्टला जोडलेली मेन पाईप लाईन दुरुस्त केली. हे सर्व करण्यासाठी त्यांना तीन तासाचा कालावधी लागला.

जलद प्रतिसाद पथकाचे मोठे सहकार्य

जिल्हा रुग्णालयातील घटनेची माहिती कळताच पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, सहायक पोलिस अधिक्षक अविनाशकुमार, नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी घटनास्थळ गाठले. पोलिस अधिक्षकांनी मदत कार्यासाठी पोलिसांचे दोन पथक तयार केले. पहिल्या पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी दुसरीकडे ठेवलेले ऑक्सीजनने भरलेले 12 सिलिंडर उचलून

कोरोना कक्षात आणले. तर दुसऱ्या पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी ऑक्सीजन पाईपवर कोसळलेले झाड उचलून बाजूला सारण्याचे काम जलद गतीने केले. ऑक्सीजनचे रिकामे सिलिंडर तातडीने गाडीत टाकून ऑक्सीजन भरण्यासाठी एमआयडीसी परिसातील कारखान्यावर आणले. तेथून 40 सिलिंडर भरून आणण्यात आले. या कामात जलद प्रतिसाद पथकातील पोलिस कर्मचारी गणेश पावडे, नवनाथ लोणसने, अभिषेक नवघरे, सादेक खान जाफर खान, मोईद खान खुर्शित खान, शैलेश टाकरस, शेख ईब्राहीम शेख युनूस, गणेश यादव, साईनाथ मोरे, विजय शेजवळ यांनी कामगिरी पूर्ण केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे