दंगल घडविणाऱ्यांवर कारवाईसाठी हिंगोलीत भाजपचे धरणे आंदोलन | BJP Agitation In Hingoli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli News
दंगल घडविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा,हिंगोलीत भाजपचे धरणे आंदोलन

दंगल घडविणाऱ्यांवर कारवाईसाठी हिंगोलीत भाजपचे धरणे आंदोलन

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : त्रिपुरात (Tripura Violence) घडलेल्या हिंसेविरोधात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे धार्मिक भावना भडकवून दंगल घडविणाऱ्या दोषींवर व त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणीसाठी हिंगोलीत भाजपतर्फे (BJP) धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे सोमवारी (ता.२२) निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, भाजपाचे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा यशोदा कोरडे, उमेश नागरे, फुलाजी शिंदे, हमीद प्यारेवाले आदींनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, की त्रिपुरामध्ये (Hingoli) कोणतीही अनुचित घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रात दंगली झाल्या.

हेही वाचा: हातात असलेल्या बंदुकीतील गोळी लागून जवानाचा दुर्दैवी मृत्यू

हजारो लोक रस्त्यावर उतरून दुकाने कार्यालये वाहनांचे नुकसान केले गेले. याचा भाजप निषेध करते. त्यानंतर पोलीस यंत्रणेकडून पक्षपाती पद्धतीने कारवाई केली आहे. अफवा पसरवून दंगलकांना पाठीशी घालून स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे उतरलेल्या सामान्य लोकांना मात्र पोलिसांकडून लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगांव, अमरावती व नांदेड येथे भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकारची चौकशी झाली पाहिजे. दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना त्यांच्या समर्थकांना अटक केली पाहिजे. दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे. स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई रद्द करावी. भारतीय जनता पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आदी मागण्यांचा यात समावेश आहे.

loading image
go to top