हातात असलेल्या बंदुकीतील गोळी लागून जवानाचा मृत्यू | Hingoli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Jawan
हातात असलेल्या बंदुकीतील गोळी लागून जवानाचा मृत्यू

हातात असलेल्या बंदुकीतील गोळी लागून जवानाचा दुर्दैवी मृत्यू

sakal_logo
By
सय्यद अतिक

आखाडा बाळापूर (जि.हिंगोली) : कळमनुरी (Kalamnuri) तालुक्यातील येलकी शिवारात असलेल्या सशस्त्र सीमा बल या तुकडीतील एक जवान आपल्या सहकाऱ्यांसह सीमा बलातील फोर्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणण्यासाठी नांदेड येथे जात असताना गाडी खड्ड्यात गेल्याने हातातील बंदुकीतील अपघाताने गोळी लागली. यात एका जवानाचा मृत्यू सोमवारी (ता.२२) पहाटे झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूरपासून जवळच असलेल्या येलकी शिवारातील कामठा फाटा येथील सशस्त्र सीमा बल या प्रशिक्षण केंद्रातील जवान पापाला भानूप्रसाद हे आंध्र प्रदेश राज्यातील जवान मागील काही महिन्यांपासून (Indian Jawan) येथे कार्य करत आहे. (Hingoli)

हेही वाचा: 'राष्ट्रपती'नंतर 'पंतप्रधाना'चा हालला पाळणा! जाणून घ्या प्रकरण

आज सोमवार सकाळी सव्वा तीन वाजता सीमा भागातील सहकारी चालक कानाराम यांच्यासोबत सीमा बलातील फोर्सच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका यांना नांदेड येथून आणण्याकरिता नांदेड रेल्वे स्टेशनकडे जात असताना डोंगरकडा शिवारात त्यांचे वाहन एका खड्ड्यात गेल्याने व जवान पापाला भानुदास याच्या हातात असलेल्या रायफलमधून अपघाताने गोळी सुटून ती सरळ छातीत घुसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ अर्धापूर (जि.नांदेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना नांदेड येथील विष्णुपुरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

loading image
go to top