छत्रपती संभाजीनगर: ‘‘चोर हा दोनशे-तीनशे रुपयांचा चोरी करतो. मात्र भाजपवाल्यांनी तर भारतीय राज्यघटनाच लुटली. लोकशाहीत मतदान हा आत्मा आहे; मतचोरीतून भाजपवाल्यांनी आत्माच गायब केला. यामुळे भाजप हा ‘व्होटचोर’ नसून डाकू आहे’’, अशी जहरी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी रविवारी केली.