बीड - पुर्वी कॉंग्रेस, मागच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस हे भाजपचे प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष. या पक्षातून आलेल्यांना जिल्हाध्यक्षपद ही भाजपध्ये जणू परंपराच पडली होती. मात्र, २२ वर्षांनंतर भाजपने या परंपरेला छेद देत मुळ पक्षातील कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपद दिले आहे. प्रभारी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदावर निवड करण्यात आली.