esakal | भाजपतर्फे कृषी विधेयकाच्या स्थगित आदेशाची होळी
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Agitation

राज्य सरकारने कृषी विधेयकाला स्थगिती दिल्याने भाजपतर्फे गुरुवारी (ता.आठ) अंबड येथे स्थगित आदेशाची होळी करण्यात आली.

भाजपतर्फे कृषी विधेयकाच्या स्थगित आदेशाची होळी

sakal_logo
By
बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) : राज्य सरकारने कृषी विधेयकाला स्थगिती दिल्याने भाजपतर्फे गुरुवारी (ता.आठ) अंबड येथे स्थगित आदेशाची होळी करण्यात आली. केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये कृषी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारे पाऊल उचलले आहे. मात्र शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम असणारी कॉंग्रेस आणि विरोधक अकारण अपप्रचार करून राजकारण करीत आहे. या नवीन कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधनमुक्त आणि दलालांच्या जोखडातून मुक्त होऊन त्याला आपल्या कष्टाने पिकलेल्या शेतमालाच्या विक्री व बाजारपेठेचे स्वतंत्र्य मिळणार आहे.

खेळाचे बोगस प्रमाणपत्र मिळविले, ३२ जणांच्या जाणार नोकऱ्या

शेतकऱ्यांसाठी एक देश एक बाजारपेठ असणार आहे. आपला शेतमाल कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे. परंतु नेहमीच शेतकऱ्यांबद्दल खोटे प्रेम दाखवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरवणारा स्थगिती आदेश काढला आहे. या स्थगिती आदेशाची होळी अंबड शहरातील पाचोड नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आघाडी सरकारच्या आणि सहकार, पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निषेधार्थ घोषणा देऊन निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष दीपकसिंह ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष अरुणभाऊ उपाध्ये, तालुकाध्यक्ष जितेंद्र पालकर, रमेश शहाणे, शहराध्यक्ष सौरभ कुलकर्णी, बाळू शहाणे, राजेश सावंत, कृष्णा राऊत, बाबूराव खरात, सुहास सोडणी, द्वारकादास जाधव, सत्यभान खरात, रावसाहेब बिडकर, धर्मा बाबर, राजू तारे, सुनील बिडे, नरेश बुंदेलखंडे, सचिन राठोड, कुँवर ठाकूर, भागवत गाडगे, यशवंत मुजगुले, रामनाथ राठोड यांच्यासह सर्व मोर्चाचे अध्यक्ष पदाधिकारी, सेलचे तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

संपादन - गणेश पिटेकर