Loksabha 2019 : आमच्यातील कमी, काँग्रेस-राष्ट्रवादीतील खुबी राज ठकारेंच्या नजरते : शहानवाज हुसैन 

प्रकाश बनकर
मंगळवार, 16 एप्रिल 2019

औरंगाबाद : प्रत्येक निवडणुकीत कोणाताही पक्ष आपल्यासाठी प्रचार करतात. राज ठाकरे हे मागच्या वेळीही प्रचार करीत होते, आताही प्रचार करत आहे. प्रचार करायचा हा त्यांचा विषय आहे. त्यांना आमच्यातील कमी आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील खुबी त्यांच्या चष्माच्या नजरेत दिसत असेल. आमच्या नजरेतून आम्हाला विकास दिसतोय. ज्या मुद्दयावर राज ठाकरे ते सभा करताय. हा त्यांचा हक्‍क आहे. ते सभा घेत राहील,त्याचा आम्हाला काहीही फरक पडणार नसल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्‍ते शहानवाज हुसैन यांनी मंगळवारी (ता.16) पत्रकार परिषदेत सांगितले. 

औरंगाबाद : प्रत्येक निवडणुकीत कोणाताही पक्ष आपल्यासाठी प्रचार करतात. राज ठाकरे हे मागच्या वेळीही प्रचार करीत होते, आताही प्रचार करत आहे. प्रचार करायचा हा त्यांचा विषय आहे. त्यांना आमच्यातील कमी आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील खुबी त्यांच्या चष्माच्या नजरेत दिसत असेल. आमच्या नजरेतून आम्हाला विकास दिसतोय. ज्या मुद्दयावर राज ठाकरे ते सभा करताय. हा त्यांचा हक्‍क आहे. ते सभा घेत राहील,त्याचा आम्हाला काहीही फरक पडणार नसल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्‍ते शहानवाज हुसैन यांनी मंगळवारी (ता.16) पत्रकार परिषदेत सांगितले. 

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात उभे असलेल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी शहानवाज हुसैन यांची वेगवेगळ्या ठिकाणी जाहिर सभा घेत आहे. 15 एप्रिला औरंगाबाद शहर आणि सिल्लोडे येथे सभा घेतली. यानंतर 16 एप्रिलला बीड जिल्ह्यात सभा होणार आहे. यापुर्वी त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. हुसैन म्हणाले, राज ठकारे हे मोठे नेते आहे. त्यांना सिमती ठेवू नका पुर्ण देशात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करावं, ते प्रचार करतील आम्हीही आमच्या भाषणातून त्यांना उत्तर देऊ देणार असं सांगत राज ठाकरे यांच्या सभा विषयी जास्त बोलणे त्यांनी टाळले. 

कलम 370 देशासाठी बाधा 
जम्मू काश्‍मिर येथील कलम 370 मूळे नागरिकांना कोणताच फायदा झालेला नाही. ही कलम हटविल्यानंतर मीही अनंतनाग मध्ये झोपडी बनवू शकतो. तेथील नागरिक बिहार आणि औरंगाबाद मध्ये घर बांधू शकता. या महान देशासाठी हि कलम मोठी बाधा असून, ही बांधा हटावीत. यामूळे कोणताचा लाभ जम्मू कश्‍मिरच्या नागरिकांना होत नाही. या कलम वरून मेहबुबा मुक्‍ती आणि उमर अब्दुला साथ सोडण्याची धमकी देताय. त्यांना एक सांगायचं तुम्हाला" जिना यहा,मरणा यहा इसके सिवा जाना कहा, म्हणजे कलम असेल आणि नसेल तरी तुम्हाला भारतासोबत राहवे लागणार आहे. जगात मुस्लिमासाठी भारतासारखा चांगला देश आणि हिंदुपेक्षा चांगला दोस्त कुठेच मिळणार नाही. देशातील लोकांना ही 370 ही कलम नकोय तरही मुफ्ती महेबुबा कलम हटविण्यासाठी विरोध करताय.त्यांनी मुस्लिम-हिंदु कशा प्रकारे एकत्र राहतात औरंगाबादेत येऊन पहावेत असे आवाहन. हुसैनी केले. 

देशात मोदीची सुनामी 
पक्षासाठी देशभरात सर्वच ठिकाणी जातोय. काश्‍मिर ते कन्याकुमारीपर्यंत केवळ नरेंद्र मोदी यांची सुनामी वाहत आहे. त्यांचे नेतृत्वात देश प्रगतीकडे जतोय. नवमतदाच्या मनात मोदी आहे. विकासाचा मुद्यावर आम्ही बोलतोय,पण राहुल गांधी आम्हाला शिव्या देऊन प्रचार करताय. यामूळे गेल्या वेळी कॉंग्रेसची जेवढे जागा निवडून आल्या होत्या,त्या आता कमी होणार आहे. याच कारणामूळे राहूल गांधीही अमेठी हा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदासंघात उभे राहीले आहे. विरेधकांची भाषेची मर्यादा ओलांडली असल्याचे सांगत त्यांनी आजम खान यांच्यावर टिका केली.आजम खान सारख्या उमेदवारांना निवडणुक आयोगाने डिर्बाट करावेत.ओवीसीही अनेक वेळा भाषेची मर्यादा ओलांडली असल्याचे सांगत द्वेष पसरवत आहे. यामूळे भाजपच देशाला पुढे घेऊन जाणार आहे. असे द्वेष पसरवणारे लोक एकत्र आले आहे. 

शिवसेनेची पक्‍की साथ 
औरंगाबादेत शिवसेना-भाजप एकत्र काम करीत आहे. शिवसेनेशी जेव्हापासून जोडलो तेव्हापासून त्यांनी धोका दिला नाही. त्यांचा भरवसाच्या साथ आहे. केंद्रातही त्यांच्या बरोबर काम केले. विधानसभेला आम्ही वेगळो लढलो तरी सत्तेसाठी पुन्हा एकत्र आलो आहे. यामूळे औरंगाबादच्या जागेबरोबर महायुतीचे मराठवाड्यातील जागाही आमच्या ताब्यात येतील

Web Title: BJP leader Shehenwaz Hussain speaks about Raj Thackeray