esakal | CAA विरोधात ठराव पास करणे भाजप नेत्यांच्या अंगलट, हकालपट्टीची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्यासह पालमचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे यांची भाजपातून हकालपट्टी.

CAA विरोधात ठराव पास करणे भाजप नेत्यांच्या अंगलट, हकालपट्टीची कारवाई

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : देशात मोदी सरकारने लागू केलेल्या नागरीकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत या कायद्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ठराव घेणाऱ्या परभणी जिल्ह्यातील भाजपच्या दोन लोकप्रतिनिधींना पक्षातून निष्कासीत करण्याचा आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता. तीन) मार्च रोजी दिले आहेत.

परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद हरिभाऊ बोराडे यांच्यासह पालम नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे यांचा समावेश आहे. या दोघांनी ही त्यांच्या नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये नागरीकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात प्रस्ताव आणून त्याचे समर्थन केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केली हकालपट्टी

यामुळे ही पक्षविरोधी कार्यवाही असल्याने त्यांनी पक्षाचा अनुशासन भंग केला असल्याने त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात येत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ता. तीन मार्च रोजी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. विनोद बोराडे हे 2014 मध्ये नगराध्यक्ष झाले होते. त्यांनी अपक्ष निवडणुक लढविली होती. सध्या सेलू नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे. 

हेही वाचा‘या’ महापालिकेचे उत्पन्न वाढीसह वसुलीकडे दुर्लक्ष

जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नगरपालिकेवर सत्ता आल्यानंतर ते त्यांच्या नगरसेवकांसह भाजपात गेले. पालमचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे हे गेल्या अनेक वर्षापासून भाजपात आहेत. त्यांचे वडील गणेश रोकडे हे गेल्या कित्येक वर्षापासून भाजपचे पदाधिकारी आहेत. या दोघांवरही कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

येथे किल्क करायांच्या’ सत्ता काळात झाली महिला अत्याचारात वाढ

पक्षाविरोधी कृत्य केलं 

आपण नागरिकत्व सुधारणा कायदा हा पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या देशातील पीडित अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी कायदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारने केला आहे. या कायद्याच्या विरोधात आपण नगर परिषदेत प्रस्ताव आणून त्याचे समर्थन करून आपण पक्षाविरोधी कृत्य केलं आहे. ही कृती अनुशासन भंग करणारी असून पार्टाने याची गंभीर दखल घेतली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकात म्हटलं आहे.