Suresh Dhas: सुरेश धस यांच्यासह भाजप नेत्या आणि इतरांना न्यायालयाने निर्दोष मुक्तता दिली, मराठा आरक्षण मोर्चा प्रकरण
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चाप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह इतरांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. कोविडकाळात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बीड : मराठा आरक्षणासाठी चार वर्षांपूर्वी काढलेल्या मोर्चाप्रकरणी दाखल गुन्ह्यातून भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह इतरांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. कोविडकाळात जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला होता.