नांदेडला खासदारांसह भाजपचे कार्यकर्ते मदतीला...

file photo
file photo

नांदेड - नांदेड शहर आणि जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे कोटेकोरपणे पालन करणारी जनता उपाशीपोटी राहता कामा नये, यासाठी खासदार या नात्याने माझ्यासह जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन या महामारीचा मुकाबला करणाऱ्या जनतेच्या मदतीसाठी धावून जात आहेत. भाजपाच्यावतीने आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास ६० हजार गोरगरीब जनतेला अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. 

वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी व दिवसरात्र रस्त्यावर खडा पहारा देणारे पोलिस कर्मचाऱ्यासह महसूल यंत्रणेच्या मदतीला भाजपाचा कार्यकर्ता मदत करत आहे. संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आपण जनतेच्या दारात जाऊन मदतकार्य सुरु केल्याची माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.

जनतेला दिलासा देण्याची भूमिका
कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवसरात्र काम करुन देशातील जनतेला कोरोनाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील एकही गोरगरीब जेवणाशिवाय उपाशी राहता कामा नये, यासाठी माझ्यासह भाजपाचे कार्यकर्ते अन्न धान्य वाटप, अन्नछात्र उभारुन भुकेलेल्यांना अन्न देण्याची भूमिका स्विकारली आहे. महामारीच्या संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देवून त्यांना मदत करण्याची भूमिका खासदार या नात्याने आपण घेतली असल्याचे चिखलीकर यांनी सांगितले.

अन्न-धान्याचे वाटप
लोकसभा मतदारसंघात चिखलीकर परिवाराच्या वतीने पाच हजार कुटुंबांना अन्न धान्य वाटप, पोलिस व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनेटायझरचे वाटप करण्याचे कार्य हाती घेतले आहे. कंधार - लोहा तालुक्यात दोन हजार गरीब परिवारांना अन्न-धान्याचे वाटप सुरु करण्यात आले आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी खासदार फंडातून एक कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. एक महिन्याचा पगारही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिला आहे. 

मदत कार्य निरंतर सुरु
लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत आपण नायगांव, मुखेड, देगलूर, बिलोली तालुक्यासह नांदेड शहरात अन्न दान व भोजन वाटपाचे काम सुरु केले आहे. आतापर्यंत भाजपाच्यावतीने 60 हजार गरीब लोकांना मदत कार्य त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यात आले आहे. हे मदत कार्य निरंतर सुरु ठेवून आणखी 40 हजार गरीब कुटूंबांना मदत पोंहचविण्याचा मानस असल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले.


पदाधिकारी, कार्यकर्ते सरसावले
ग्रामीण भागातील वाडी-तांड्यावर जावून गरीबांना अन्न धान्य पोंहचविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नांदेड शहरातील गरीब जनतेलाही अन्न-धान्य, भोजनाचे डबे पोंहचविण्याचे काम भाजपाच्यावतीने सुरु झाले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकट पाटील गोजेगावकर, भाजपाचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य सुरु केले आहे. नायगावला प्रदेश भाजपाचे कार्यकारी सदस्य श्रावण पाटील भिलवंडे, भाजपाचे कार्यकर्ते शिवराज पाटील होटाळकर व त्यांच्या सहकार्याने गोरगरीब जनतेला धान्य वाटपाचे काम सुरु केले आहे. मुखेड व देगलूर तालुक्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर यांनी आपल्या स्वखर्चातून अन्न धान्य वाटप व भुकेलेल्यांना जेवण देण्यासाठी अन्नछात्र सुरु केले आहे. किनवटला भाजपाचे आमदार भीमराव केराम व भाजप पदाधिकाऱ्यांच्या टीमनेही जनतेला मदत करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com