Beed News : बीडमध्ये महायुतीच्या सभेत भाजपच्या दोन आमदारांची दांडी; पंकजाताईंच्या टोमण्याने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

पदवीधर निवडणुकीच्या प्रचारसभेला दोन्ही भाजप आमदारांच्या गैरहजेरीची जोरदार चर्चा; नेमकं चाललंय काय जिल्ह्यात?
pankaja munde

pankaja munde

sakal

Updated on: 

- नितीन चव्हाण

बीड - मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जजैसे जशी जवळ येत आहे, तसतसे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. शनिवारी बीड शहरातील रामकृष्ण लॉन्स येथे महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ एक भव्य सभा पार पडली. महायुतीची ही ताकद दाखवणारी सभा असली, तरी या सभेची चर्चा वेगळ्याच कारणांमुळे संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे. या हाय-प्रोफाइल सभेला भाजपचे दोन्ही स्थानिक आमदार म्हणजेच आ. सुरेश धस आणि आ. नमिता मुंदडा यांनी चक्क दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com