भाजपचा युवा मोर्चा उतरला नवाब मलिकांविरोधात,केले जोडे मारो आंदोलन | Bharatiya Janta Yuva Morcha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharatiya Janta Yuva Morcha
भाजपचा युवा मोर्चा उतरला नवाब मलिकांविरोधात,केले जोडे मारो आंदोलन

भाजपचा युवा मोर्चा उतरला नवाब मलिकांविरोधात,केले जोडे मारो आंदोलन

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील गांधी चौकात गुरुवारी (ता.११) भारतीय जनता युवा मोर्चातर्फे (Bharatiya Janta Yuva Morcha) मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आदेशावरून भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण यांच्या नेतृत्त्वात येथील गांधी चौकात राष्ट्रवादी पार्टीचे नेते महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच त्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच सर्व युवा मोर्चा व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यातर्फे त्यांनी मंत्रीपदाचा (Hingoli) राजीनामा द्यावा अशा घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत ईडीचे छापे, उद्योजकांचे धाबे दणाणले

जो पर्यन्त नवाब मलिक राजीनामा देत नाहीत तो पर्यंत भाजपा युवा मोर्चा तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष पप्पु भाऊ चव्हाण यांनी दिला आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, प्रा. दुर्गादास सकाळे, जिल्हा सरचिटणीस फुलाजी शिंदे, श्रीरंग राठोड, शहर अध्यक्ष प्रशांत सोनी, तालुका अध्यक्ष संतोष टेकाळे, गोविंद भवर, माजी सैनिक गजानन कावरखे , युवा मोर्चा उपजिल्हा अध्यक्ष बंटी राठोड, अमोल देशमुख, बंडू कऱ्हाळे, सर्कल प्रमुख लक्ष्मण थोरात, संजय पहिलवान, प्रवीण जाधव , कृष्णा ढोके, सचिन शिंदे,आशीष जयस्वाल, सुमित घीके, रवी इंगळे, मयूर दंडे, महिला ओबीसी महिला आघाडी अध्यक्षा रजनी पाटील, यशोदा कोरडे, उज्वला खोलगाडगे आदी भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला सहभागी झाल्या होत्या.

loading image
go to top