‘संकटकाळी माझे योगदान’ शिबीरात २४९ जनांचे रक्तदान

blowd donate.jpg
blowd donate.jpg

नांदेड : राज्यासह देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून लॉक डाउन लागू करण्यात आला तर संचारबंदीचे आदेशही लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ज्या रुग्णांना रक्ताची नितांत गरज आहे अशा रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे यासाठी युवक काँग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी ‘संकटकाळी माझे योगदान’ हा रक्त संकलनाचा अभिनव उपक्रम हाती घेतला. अवघ्या चार दिवसात तब्बल २४९ रक्तदात्यांनी रक्तदान करून युवक काँग्रेसच्या या अभियानात मोठा  प्रतिसाद दिला.

पालकमंत्र्यांच्या आवाहनामुळे शिबीर
राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. शिवाय संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने कायद्याचा बडगा आहेच. नागरिक घरातच अडकून असल्याने रक्तदातेही मोठ्या संख्येने घटले होते. त्यामुळे विविध आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना आवश्यक असणारा रक्तपुरवठा कमी झाला होता. रक्ताचा वाढता तुटवडा लक्षात घेता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानुसार माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी ‘संकटकाळी माझे योगदान’ या उपक्रमातून रक्तदान करण्याचा संकल्प केला. 

युवक काँग्रेसचा उपक्रम
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर आणि श्याम कोकाटे, रहीम खान, डॉ. दिनेश निखाते, अतुल वाघ, राहुल देशमुख, माणिक देशमुख, गोविंद तोरणे, मुन्ना देशमुख, संजय गोटमुखे, राहुल किन्हाळकर, शेख नदीम, प्रसेनजीत वाघमारे, रमेश तालीमकर, त्र्यंबक शिंदे, अमणप्रितसिंह कथुरिया, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ह्या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभाग नोंदवला.

पाच दिवसाचा उपक्रम
‘संकटकाळी माझे योगदान’ हा उपक्रम तब्बल पाच दिवस राबवण्याचा संकल्प करत डॉ. विठ्ठल पावडे यांनी रक्तदाते तरुणांना वैयक्तिक फोन करून रक्तदानासाठी बोलावून घेतले. शिवाय विविध सोशल माध्यमांचा वापर डॉ. विठ्ठल पावडे यांनी केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी, राष्ट्रीय कार्यात आपले योगदान देण्यासाठी अनेक युवकांनी आणि नागरिकांनीही युवक काँग्रेसच्या या अभियानात सहभाग नोंदवला. 

तब्बल २४९ जनांचे रक्तदान शिबीर
पाचव्या दिवशीसाअखेर तब्बल २४९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. श्री हुजुर साहेब ब्लड बँक आणि जीवन आधार ब्लड बँकेच्या माध्यमातून डॉ. विठ्ठल पावडे यांनी करून घेतले.  एकीकडे संचारबंदी, लॉकडाउन लागू आहे तर दुसरीकडे बाहेर घेण्यासही मज्जाव आहे. अशा परिस्थितीत रक्तदात्यांना ब्लड बँकेपर्यंत नेणे आणि आणण्याची व्यवस्थाही डॉक्टर विठ्ठल पावडे यांनी केली होती. पोलिस विभागाशी समन्वयाने चर्चा करून रक्तदात्यांना रक्तदानासाठी नेताना आणि आणताना कुठेही अडचण होणार नाही याची खबरदारी विठ्ठल पावडे यांनी घेतली होती. शिवाय एखाद्या रक्त दात्याने आणी स्वतः विठ्ठल पावडे यांनी केली. त्यामुळेच ‘संकटकाळी माझे योगदान’ या अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रमात २४९ रक्तदात्यांना रक्तदान करता आले. 

भविष्यातही करणार रक्तदान शिबीराचे आयोजन
भविष्यातही रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ज्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा. कोरोनाला हरविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि ज्यांना रक्ताची गरज आहे अशा रुग्णांना रक्तदान करून जीवनदान द्यावे असे आवाहन ‘संकटकाळी माझे योगदान’ या अभिनव उपक्रमाचे संयोजक, संकल्पक तथा नांदेड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी केले आहे. एवढ्या संचारबंदीतही रक्तदात्यांनी घराबाहेर पडण्याचे धाडस दाखवले त्याबद्दल मनापासून संयोजकांनी आभार मानले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com