‘या’ तालुक्यात रक्तदात्यांचा कौतुकास्पद उपक्रम

_107317099_blooddonor976.jpg
_107317099_blooddonor976.jpg


धर्माबाद, (जि. नांदेड) ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे लक्षात येताच धर्माबाद येथील शिवा संघटना व पोलिस ठाण्याच्या संयुक्त पुढाकाराने शनिवारी (ता. चार) सकाळी साडेसात वाजता पोलिस स्टेशन धर्माबाद येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरात दोनशेच्या वर रक्तदाते रक्तदान करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.


कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न 
सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीने ग्रस्त असून भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाउन करण्यात आले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे अनेक संकटांशी सामना करावा लागत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी राज्यभरामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे प्रशासनापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. दरम्यान, अशा संकटकाळी गरजू व्यक्तींनी रक्तदान करावे, असे आवाहन शासन स्तरावरून करण्यात येत आहे.


सर्वांच्या सहकार्यातून कार्य
अशा कठीण प्रसंगी सर्वांच्या सहकार्यातून रक्ताला कुठलीही जात, पात, धर्म, पंथ नसतो या सामाजिक जाणिवेतून व देशहिताच्या नजरेतून शिवा संघटना धर्माबाद तालुका व पोलिस स्टेशन धर्माबाद यांच्या संयुक्त पुढाकाराने शनिवारी सकाळी साडेसात वाजता पोलिस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरात दोनशेच्या जवळपास स्वयंत्स्फूर्तपणे रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी शिबिरात सहभाग घेऊन नाव नोंदणी केली असल्याचे आयोजकांनी सांगितले आहेत. 

तरी स्वयंत्स्फूर्तपणे रक्तदान करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या रक्तदात्यांनी शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. आबासाहेब पाटील बन्नाळीकर, शिवा कर्मचारी महासंघाचे जिल्हा प्रमुख, वीरभद्र बसापुरे, राहुल पाटील बाळापूरकर, लल्लेश मंगनाळीकर, सागर चिद्रावार, ना. सा. येवतीकर, आनंद येडपलवार, रमेश कुंभारे, सतीश पाटील हारेगावकर, कृषी फर्टिलायझर असोसिएशनचे अध्यक्ष रत्नाकर पाटील कदम, सय्यद अल्ताफ भाई, शिवसेनेचे संघटक गणेश गिरी, शिवसेनेचे शहर प्रमुख अनिल कमलाकर, राम रोंटे, आनंद राठी, कपिल सारडा, समीर अहमद, पोलिस कर्मचारी संतोष अनेराये, साईनाथ स्वामी रोशनगावकर, ॲड. राहुल सोनटक्के यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com