आत्महत्या केलेल्या आई व मुलीचा मृतदेह सापडला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

नांदेड : आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह एका महिलेने बाभळी बंधाऱ्यात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. २३ जून) घडली होती. त्यातील सुविद्या कांबळे या मुलीचा मृतदेह लगेच सापडला होता. परंतु, आई पूजा कांबळे व शिवानी कांबळे या दोघींचा मृतदेह सापडला नव्हता. तब्बल १८ तासानंतर या दोघींचा मृतदेह रविवारी (ता. २४) सकाळी सापडला. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंडलवाडी येथील आचारी व्यवसाय करणारे यादव श्रीनिवास कांबळे यांची पत्नी पूजा (रिंकुबाई) हिला पती यादव कांबळे हा माहेराहून पैसाची मागणी करून सतत मानसिक व शारीरिक त्रास देत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून पूजाने (वय ३२), शिवानी यादव कांबळे (६), सुविद्या यादव कांबळे (३) या दोन मुलींना घेऊन शेळगाव जवळील गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. 

सकाळी गोदावरी नदीच्या उत्तरेस दहा किलोमीटर अंतरावर पूजा कांबळे व शिवानी कांबळे यांचे मृतदेह आढळून आले. दोघींचेही मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडलवाडी येथे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणी मयत पूजा कांबळेचे वडील चांदु गणपती वाघमारे (वय ५५, रा.तेल्लूर ता.कंधार) यांच्या फिर्यादीवरून पती यादव श्रीनिवास कांबळे याच्याविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांनी दिली.

Web Title: The bodies of the victim and her daughter were found