अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील बोरी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शाळा आहे. एकुण आठ वर्गासाठी केवळ पाच वर्ग खोल्या आहे. यापैकी चार वर्ग खोल्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. केवळ एकच वर्ग खोली वापरण्या योग्य आहे.यामुळे विद्यार्थ्याना उघड्यावर बसावे लागत आहे.