Bhoom Marriage : आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीला लग्नाला आणण्यासाठी सासू सासऱ्यांनी पाठवले हेलिकॉप्टर

भूम तालुक्यात अनोखा आगळावेगळा विवाह सोहळा संपन्न.
marriage
marriagesakal
Updated on

- धनंजय शेटे

भूम - आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीला मिळाले असे सासू-सासरे भूम तालुक्यातील अंतरवली गावात नुकताच एक अनोखा लक्षवेधी विवाह सोहळा पार पडला. येथील शेतकरी भास्कर शिकेतोड यांनी आपल्या मुलाच्या लग्नात शाही थाटाचा अनुभव देत नवरीसाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले.

या विवाह सोहळ्याची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे नवरी सर्वसामान्य कुटुंबातील असूनही शिकेतोड यांनी आपल्या मुलाचा विवाह अत्यंत थाटात साजरा केला.

marriage
marriagesakal

हेलीकॅप्टरद्वारे नवरीला आणल्याने उपस्थित पाहुणे आणि गावकरी थक्क झाले. अक्षरशा: हा क्षण नातेवाईकांनी गावकऱ्यांनी मोबाईल मध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर ही या विवाह सोहळ्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

कुटुंबाने केलेली ही विशेष सजावट व्यवस्था आणि शाही पद्धतीने पार पडलेला सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. विवाहाच्या निमित्ताने अंतरवाली गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

सायंकाळच्या सुंदर अशा वातावरणामध्ये नळी वडगाव फाटा तालुका भूम येथे विवाह सोहळा पार पडला. यावेळी पंच कृषी क्रोषोतील ग्रामस्थ यावेळी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com