सासरवडीत जावयाचा थयथयाट, म्हणाला तलाक.....

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

जावयाने थयथयाट करत पत्नीला तलाक..तलाक..तलाक म्हणून भावाच्या लग्नाची पत्रिका फेकून देऊन गोंधळ घातला. या गोंधळी जावयावर विमानतळ पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १८) जानेवारी रोजी मुस्लीम महिला (विवाह संरक्षण) वटहुकुम कायद्यानुसार गुन्हा दाखल

नांदेड : माझ्याविरुध्द पोलिसात तक्रार का दिली म्हणून सासरवाडीत आलेल्या जावयाने थयथयाट करत पत्नीला तलाक..तलाक..तलाक म्हणून भावाच्या लग्नाची पत्रिका फेकून देऊन गोंधळ घातला. या गोंधळी जावयावर विमानतळ पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १८) जानेवारी रोजी मुस्लीम महिला (विवाह संरक्षण) वटहुकुम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

शहराच्या विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा असिफोद्दीन रजीयोद्दीन फशीब याचे व त्याच्या पत्नीचे नेहमी वाद होत होते. यातूनच त्याची पत्नी आपले माहेर असलेल्या जवाहरनगर येथे राहण्ययासाठी गेली होती. त्यापूर्वी तिने आपल्या पतीविरुध्द पोलिसात तक्रार दिली होती. हा राग पतीच्या मनात होता. तरीसुध्द आपल्या भावाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी तो सोमवारी (ता. १३) जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास सासरवाडीत गेला. वाद जरी असला तरी घरी आलेल्या पाहुण्याचे आदरतिथ्य करण्यासाठी सासरची मंडळी पुढे आली. 

हेही वाचा -पाथरीकर बंद न करता करणार महाआरती...

आजसे तु मेरी बीबी नही रही

परंतु पोलिसात तक्रार दिल्याचा राग त्याच्या मनातून जात नसल्याने त्याने सासरवाडीत वाद घातला. एवढेच नाही तर पत्नी व सासरवाडीतील अन्य नातेवाईकांना त्याने शिविगाळ केली. पत्नीला मै तेरेकु छोड देरु असे म्हणून तलाक...तलाक..तलाक बोलला. आजसे तु मेरी बीबी नही रही असे म्हणून सोबत आणलेल्या भावाच्या लग्नाच्या पत्रीका फेकून देऊन निघून गेला. या प्रकरणानंतर पिडीत विवाहितेच्या नातेवाईकांनी विचारविनीमय करून शेवटी त्याच्याविरूध्द विमानतळ पोलिस ठाण्यात कलम ४ मुस्लीम महिला (विवाह संरक्षण) वटहुकुम कायदा अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अशोक कुरुळेकर करीत आहेत. 

येथे क्लीक करापोलिसांचे आता महाट्राफीक ॲप

खंजर बाळगणारा अटक

नांदेड : विनापरवाना बेकायदेशिररित्या कुठला तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने खंजर बाळगणारा इतवारा पोलिसांच्या तावडीत सापडला. ही कारवाई मोमीनपूरा परिसरातील दिवाणी बावडी भागात गुरूवारी (ता. १६) रात्री साडेआठच्या सुमारास केली.

इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली धनराज यादव हे पोलिस हवालदार आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालीत होते. यावेळी त्यांना मोमीनपूरा येथील दिवाणी बावडी परिसरात एक युवक आपल्या हातात खंजर घेऊन थांबलेला आढळून आला. तो कुठला तरी मोठा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील खंजर जप्त केले. धनराज यादव यांच्या फिर्यादीवरुन खंजर बाळगणाऱ्या युवकावर इतवारा पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा प्रतिबंधनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. काकडे करीत आहेत. 
     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brother in law to go to mother-in-law, said divorce .....