पाचोड - घराच्या वाटणी आणि बांधकामाच्या कारणावरून दोन सख्या भावांत झालेल्या जोरदार हाणामारीत चौघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.१२ )सकाळी सात वाजेच्या सुमारास मुरमा (ता.पैठण) येथे घडली आहे. .यासंबंधीअधिक माहिती अशी, मुरमा (ता.पैठण) येथील सुदामती गणपत मानमोडे (वय ४०) यांनी पाचोड पोलिस ठाण्यांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,'सोमवारी (ता.१२) सकाळी सात वाजेच्या सुमारास नियमितपणे घराचे अंगण झाडत असताना त्यांचे दिर रामु गंगाधर मानमोडे यांनी घर बांधण्याच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली..त्यावेळी सासरे गंगाधर नाथा मानमोडे व सासू लक्ष्मीबाई गंगाधर मानमोडे हे समजावण्यासाठी गेले असता, रामू मानमोडे याने हातातील काठीने वृद्ध सासू -सासऱ्यास मारहाण केली. या मारहाणीत दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर सासू-सासऱ्यांना मारहाण होत असल्याचे पाहून फिर्यादी स्वतः भांडण सोडवण्यासाठी गेले असता रामु मानमोडे याने फिर्यादीस काठीने मारहाण करून खाली पाडले..त्यानंतर चापट-बुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या कानावर व पाठीवर वार करण्यात आले. या झटापटीत त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने आणि गळ्यातील पोत गहाळ झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच रामू याने मोबाईल हिसकावून घेत ब्लाउज च्या खिशातील सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले..पत्नी सुदामती व आई-वडिलांना होणारी मारहाण पाहून पती गणपत गंगाधर मानमोडे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु यांनाही रामू मानमोडे याने काठीने मारहाण करून जखमी केले. फिर्यादी सुदामती ही तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जात असताना या लोकांनी तिला रस्त्यात अडवून केस धरून खाली पाडून बेदम मारहाण केले व पुन्हा गावात आलात तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी संबंधितांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे..याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात रामू मानमोडे व रंजना मानमोडे यांच्या विरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसउपनिरीक्षक महादेव नाईकवाडे यांचेसह जमादार ताराचंद घडे हे करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.