
आर्यसत्य व अष्टांगिक मार्ग यांच्या माध्यमातून संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखविणारे भगवान गौतम बुद्ध यांची वैशाख पौर्णिमेला जयंती दरवर्षी संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होते.परंतु, यंदा लॉकडाउनमुळे हे कार्यक्रम घरीच पार पडले.
घरीच साजरी झाली बुद्ध पौर्णिमा; फिजिकल डिस्टन्सिंग पाळत अभिवादन
परभणी : जगाला शांतीचा मार्ग दाखविणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती अर्थात बुद्ध पौर्णिमा गुरुवारी (ता. सात) शहरासह जिल्ह्यात घरीच साजरी करण्यात आली. बुद्ध विहारामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळत अभिवादन करण्यात आले.
आर्यसत्य व अष्टांगिक मार्ग यांच्या माध्यमातून संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखविणारे भगवान गौतम बुद्ध यांची वैशाख पौर्णिमेला जयंती दरवर्षी संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होते. परभणी शहर आणि जिल्ह्यात या निमित्ताने विविध कार्यक्रम असतात. सामुदायिक बुद्ध वंदना, विहारमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु, यंदा लॉकडाउनमुळे हे कार्यक्रम घरीच पार पडले. अनुयायांनी घरीच कुटुंबासह पौर्णिमा साजरी केली. सकाळी घरीच भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर ग्रंथाचे वाचन करण्यात आले. तसेच बुद्ध वंदना घेण्यात आली.
हेही वाचा : परभणीच्या वातावरणात होत आहेत बदल : कोणते ते वाचा
भीमनगरात गरजूंना मदत
परभणी शहरातील बुद्ध विहारमध्ये मोजक्याच अनुयायांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजवंदन करण्यात आले. शहरातील भीमनगर येथील तथागत उद्यानात आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच नगरसेवक सुशील कांबळे यांच्यावतीने एक हजार मास्कचे परिसरात वाटप करण्यात आले. तसेच ७८ गरजूंना अन्नधान्याच्या किट देण्यात आल्या.
हेही वाचा : ‘सकाळ’च्या बातमीची दखल : विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा
कावलगाव येथे कार्यक्रम
कावलगाव (ता. पूर्णा) येथे तथागत भगवान बुद्ध यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथामिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक बनसोड होते, तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य कोंडिबा सोनटक्के, प्रा. जी. सी. बिऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते नारायण पिसाळ, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेरमन बाबूराव देशमुख, ज्ञानोबा वंजे, पोलिस पाटील अविनाश वंजे, रामराव पिसाळ, मनोहर दुधमल, देवानंद दुधमल, चंद्रकांत भोसले, दिगंबर दुधमाल, माधवराव डाके, सुशेन बिऱ्हाडे उपस्थित होते.
Web Title: Buddha Pournima Was Celebrated Home Parbhani News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..