Theft News: धाराशिव जिल्ह्यात म्हशींची चोरी; वडगाव आणि फुलवाडी तांड्यातून चार जनावरे लंपास

Buffalo Theft, Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील वडगाव आणि तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी तांडा येथून गोठ्यातील चार म्हशी चोरीला गेल्या. दोन्ही घटनांमध्ये एकूण तीन लाख रुपये किमतीची जनावरे चोरट्यांनी लंपास केली असून, संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत.
Four buffaloes were stolen from cattle sheds in Wadgaon and Fulwadi Tanda in Dharashiv district.

Four buffaloes were stolen from cattle sheds in Wadgaon and Fulwadi Tanda in Dharashiv district.

esakal

Updated on: 

धाराशिव, : तालुक्यातील वडगाव शिवार, तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी तांडा येथून प्रत्येकी दोन अशा चार म्हशी चोरट्यांनी गोठ्यातून लांबविल्या आहेत. फुलवाडी तांडा २ (ता. तुळजापूर) येथील रमेश लक्ष्मण चव्हाण (वय ५९) व त्यांच्या चुलत सासऱ्यांच्या मालकीच्या एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी रविवारी (ता. एक) पहाटे पत्र्याच्या शेडमधून चोरट्यांनी चोरी केल्या.

Loading content, please wait...