बफे संस्कृतीमुळे अन्नाची होतेय नासाडी

भागवत पेटकर
सोमवार, 15 मे 2017

समाजातील विसंगतीचा विचार होण्याची गरज

नांदेडः लग्नसोहळा व कोणताही कार्यक्रम असो, भोजनाशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. परंतु, आज या जेवणावळीचे स्वरूपच बदललेले दिसून येत आहे. पंगतीची जागा आता बफे पद्धतीने घेतलेली आहे. परंतु, या बफे संस्कृतीमुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

समाजातील विसंगतीचा विचार होण्याची गरज

नांदेडः लग्नसोहळा व कोणताही कार्यक्रम असो, भोजनाशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. परंतु, आज या जेवणावळीचे स्वरूपच बदललेले दिसून येत आहे. पंगतीची जागा आता बफे पद्धतीने घेतलेली आहे. परंतु, या बफे संस्कृतीमुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लग्नप्रसंगात सरासरी शेकडो व हजारो लोकं असतात. बफे पद्धतीमुळे रांगा लाऊन ताट वाढून घेण्याचा त्रास थांबविण्यासाठी अनेकजण ताटातच गरजेपेक्षा जास्त वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही सर्व पदार्थ वाढून घेतले जातात. भूकेपेक्षा जास्त अन्न घेतल्याने पोट भरल्यावर हे अन्न फेकले जाते.

एका लग्नसोहळ्यात किमान 100 ते 150 लोकांचे अन्न वाया जात असल्याचे दिसून येते. उघड्यावर फेकलेले अन्न खराब झाल्याने मिथेन या घातक वायूची निर्मिती होते. ग्लबल वॉर्मिंग व वातावरणातील बदलास ही नासाडी एकप्रकारे कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांच्या नजरेतून दिसून येते. "अन्न हे पूर्णब्रम्ह आहे', असे म्हणणाऱ्या आपल्या देशातच अनेकांना रात्री उपाशीपोटी झोपावे लागत आहे. अशात होणारी अन्नाची नासाडी ही विसंगती दर्शविणारी बाब आहे. ताटातील उष्टे अन्न उघड्यावर टाकून दिल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होतो. अन्न उघड्यावर न टाकता योग्य वापर केल्यास अन्नपूर्णा देवीचा सन्मान होतो, हे समजणे गरजेचे आहे. गरीब व्यक्ती आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करतो. त्याच देशात कोट्यवधी रूपयांचे अन्न फेकून दिले जाते. एवढेच नव्हे, तर फेकून दिलेले अन्न जनावरांनी खाल्ल्यास त्यांच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे. म्हणून, याबाबत समाजातील संबंधितांनीच गांभीर्याने विचार करून योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

सामाजिक संघटनांनी पुढे यावे
समाजातील अनिष्ट रुढी, परंपरांविरोधात अनेक सामाजिक संघटना पुढे आलेल्या आहेत. अशा संघटनांनी मंगल कार्यालयांतील तसेच अन्य ठिकाणच्या कार्यक्रम, समारंभातील शिल्लक राहिलेले अन्न गोळा करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. हे अन्न रस्त्यावर आयुष्य काढणाऱ्या, भुकेल्यांना देता येऊ शकते. त्यासाठी "रोटी बॅंक' ही संकल्पना राबविण्याची गरज आहे. नुसती संकल्पना राबवून उपयोगाचे नाही, तर त्याचा प्रचार, प्रसारही करायला हवा.

Web Title: buffet culture causes food waste