जालन्यात आता टोलेजंग इमारती

पालिकेकडून ७० मीटर उंचीपर्यंत बांधकाम परवाना
Jalna City
Jalna CitySakal

जालना - मराठवाड्यातील महत्त्वाचे औद्योगिक आणि व्यापारी शहर म्हणून जालना सर्वत्र ओळखले जाते. त्यामुळे शहरात रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शहराचा हळूहळू विस्तार होत आहे. अशात नगरपालिका हद्दीत आता नवीन इमारतीसाठी ७० मीटर उंचीपर्यंत बांधकाम परवाना नगरपालिकेकडून मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शहरात आता टोलेजंग इमारती दिसणार आहेत.

जालना शहरात प्रत्येक जण रोजगाराच्या शोधात दाखल होते. येथे असलेल्या स्टील उद्योग, सिड्स उद्योग, व्यापार यामुळे रोजगाराची संधी अधिक आहे. त्यामुळे जालना शहरात दाखल झालेले अनेक जण येथेच स्थायिक होतात. परिणामी शहरातील लोकसंख्या वाढली असून शहराचा विस्तार झाला आहे. काही दशकापूर्वी नूतन वसाहत उड्डाणपूल, मंठा चौफुली, राजूर चौफुली, कन्हैय्यानगर बायपास, नवीन बाजार समिती, चंदनझिरा आदी भागांकडे तुरळक वस्त्या होत्या. मात्र, आजघडीला मंठा चौफुली, अंबड रोड, चंदनझिरा, खरपुडी रोड, अंबड चौफुली ते मंठा चौफुली बायपास आदी ठिकाणी शहराचा झपाट्याने विस्तार झाला आहे.

पूर्वी जालना शहरामध्ये दोन ते तीन मजली इमारत बांधण्याचा परवाना नगरपालिकेकडून दिला जात होता. त्यामुळे घरांची संख्याही वाढत होती. मात्र, आता फ्लॅट सिस्टीम बांधकामांमध्ये ७० मीटर उंचीपर्यंत इमारतींना बांधकाम परवाना मिळणार आहे. या बांधकाम परवानासाठी प्लॉटच्या चारही बाजूने मोकळी जागा, वाहनतळ, अग्निशमन यंत्रणा आदी नियमांची पुर्तता केल्यानंतर जागेच्या क्षमतेच्या नियमांनुसार किती मीटर उंच इमारत बांधणे शक्य आहे, याची सर्व कायदेशीर बाजी तपासली जाईल, त्यानंतर नगरपालिकेकडून बांधकाम परवाना दिला जाणार आहे. शिवाय दहा ते बारा मजले इमारतींचे बांधकाम करताना तळमजल्यावर पार्किंग व्यवस्थाही करावी लागणार आहे. सर्व नियम व निकषांचे पालन केल्यानंतर ७० मीटर उंचीपर्यंत टोलेजंग इमारती उभारणीचा मार्गही मोकळा होणार आहे. त्यामुळे भविष्यात जालना शहरातही मुंबई, पुणे, औरंगाबादप्रमाणे टोलेजंग इमारती दिसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com